Friday, August 18, 2017

परम श्रेयासाठी प्रार्थना

हे प्रभो !

दुर्गुण झडोनी । सद्गुण जडोत ।
गुणातीततेची । आंस पडो ।।१।।
श्रद्धा दृढ होवो । भक्ती नित्य घडो 
स्वभावचि होवो । तपस्विता ।।२।।
इंद्रियांसी नको । विषयांची बाधा ।
प्रज्ञा स्थिर राहो । सर्वकाळ ।।३।।
यज्ञ तप दान । ऐसी कर्मे तरी ।
सदैव होतील । ऐसे करी ।।४।।
सर्वभूतात्मता । व्हावी ती क्रमानें ।
कृपा असो द्यावी । दासावरी ।।५।।
(१) दुर्गुण झडोनी सद्गुण जडोत 


No comments: